‘या’ व्यक्तीमुळे दामिनी मीनाक्षीने बॉलिवूडला केला कायमचा अलविदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 22:22 IST
बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने अभिनय आणि डान्सिंग कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये खूपच कमी वयात स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. ८०च्या दशकात ...
‘या’ व्यक्तीमुळे दामिनी मीनाक्षीने बॉलिवूडला केला कायमचा अलविदा !
बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने अभिनय आणि डान्सिंग कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये खूपच कमी वयात स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. ८०च्या दशकात मीनाक्षीचा असा काही जलवा होता की, तिला अल्पावधितच सुपरस्टारचा दर्जा मिळाला. शिवाय ‘दामिनी’ या चित्रपटाने तिला ‘बॉलिवूडची दामिनी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु असे काय घडले असावे की, १९९६ मध्ये तिला बॉलिवूडमधून कायमचे गायब व्हावे लागले. याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. मीनाक्षीने बॉलिवूडमध्ये वयाच्या केवळ १८व्या वर्षी सुपरहिट अभिनेत्रीचा किताब मिळविला होता. साधारण चेहरा असलेल्या मीनाक्षीने ‘दामिनी’, ‘हीरो’, ‘घायल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारून तिच्यातील दमदार अभिनय दाखवून दिला होता. शिवाय डान्स हादेखील तिच्यातील अतिरिक्त गुण असल्याने तिची बॉलिवूडमधील उत्कृष्ट क्लासिकल डान्सर अभिनेत्रींमध्ये गणना केली जाऊ लागली. तिने जवळपास सर्व मोठ्या निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्याचबरोबर महानायक अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर, सनी देओल यांसारख्या बड्या अभिनेत्यांबरोबरही काम केले. अशात मीनाक्षीचे बºयाच अभिनेत्यांबरोबर नावही जोडले गेले; परंतु ती राजकुमार संतोषी यांच्यावर प्रेम करीत होती. मात्र जेव्हा राजकुमार यांनी तिला प्रपोज केले तेव्हा तिने आश्चर्यपणे त्यांना नकार दिला. असे म्हटले जाते की, ‘दामिनी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजकुमार संतोषी यांनी तिला प्रचंड त्रास दिला होता. जाणूनबुजून राजकुमार संतोषी मीनाक्षीकडून ओके असलेला शॉट पुन्हा पुन्हा करून घेत होते. कारण मीनाक्षीने त्यांच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. परंतु संतोषी मीनाक्षीचा नकार स्वीकार करण्यास तयार नव्हते. अखेर जे व्हायचे तेच घडले. एक दिवस राजकुुमार संतोषी यांनी मीनाक्षीला रागाच्या भरात खूप सुनावले. त्यावेळी मीनाक्षी ‘घातक’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. संतोषी यांचा हा स्वभाव मीनाक्षीला खूपच खटकला. तिने कशीबशी ‘घातक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा बायबाय केला.