Join us

​दलबीर कौर यांनी रणदीपला मागितले हे वचन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 20:42 IST

रणदीप हुडाचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या तुरूंगात अखेरचा श्वास घेणारा भारतीय कैदी ‘सरबजीत’च्या आयुष्यावर बेतलेला हा ...

रणदीप हुडाचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या तुरूंगात अखेरचा श्वास घेणारा भारतीय कैदी ‘सरबजीत’च्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. रणदीपने या चित्रपटात सरबजीतची भूमिका साकारली आहे. सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी सरबजीतसाठी दीर्घकाळ लढा दिला. ही लढाई आजही सुरु आहे. संपूर्ण चित्रपटात सरबजीत व दलबीर कौर या भावा-बहिणीचे नाते वेगळ्या अंगाने चित्रीत करण्यात आले आहे. आता सरबजीत तर या जगात नाही. मात्र सरबजीतची बहीण दलबीर यांनी रणदीप हुडाला असे वचन मागितले की, रणदीप काही क्षणांसाठी भावूक झाला. मी मेल्यानंतर तूच मला खांदा द्यावा, असे वचन दलबीर यांनी रणदीपला मागितले. सरबजीतच्या तिसºया पुण्यतिथीदिनी आयोजित कार्यक्रमात दलबीर यांनी ही मागणी केली. रणदीपमध्ये खरोखरच सरबजीत दिसला. माझ्या मृत्यूनंतर रणदीपने मला खांदा द्यावा, अशी माझी इच्छा आहे. असे झाल्यास सरबजीतने मला खांदा दिला असे समजून माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असे दलबीर म्हणाल्या. त्यांचे हे शब्द रणदीला भावूक करून गेले. येत्या २० मे रोजी ‘सरबजीत’ रिलीज होतो आहे.