भाईजानसमोर डेझीची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:02 IST
दबंग सलमान खानसमोर भल्याभल्यांची बोलती बंद होते. ‘भाई का गुस्सा भी अलग, भाई का प्यार भी अलग’ असे म्हटले ...
भाईजानसमोर डेझीची बोलती बंद
दबंग सलमान खानसमोर भल्याभल्यांची बोलती बंद होते. ‘भाई का गुस्सा भी अलग, भाई का प्यार भी अलग’ असे म्हटले जाते. त्याचे लेटेसट उदाहरण म्हणजे डेझी शाह. ‘जय हो’ चित्रपटाद्वारे सलमानने तिच्यासाठी चंदेरी दुनियाची दारे खुली केली.ती म्हणते, सलमानसमोर मला काय बोलावे तेच सुचत नाही. काहीही बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करते. मी त्याची पहिल्यापासून खूप मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत हीरोईनची भूमिका करण्याची संधी मिळणे म्हणजे सर्व काही मिळवल्यासारखे आहे.ईशा अमिनच्या समर कलेक्शनचे लाँच डेझीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ती म्हणाली की, सलमान सुपरहॉट आहे. त्याला प्रत्येक ड्रेस शोभून दिसतो.करियरविषयी बोलताना तिने सांगितले की, मी सध्या पटकथा वाचण्यात बिझी आहे.