Join us

डॅड शाहरूख खानची ‘ही’ सवय सुहाना खानला आणते वैताग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 10:58 IST

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे.  बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी आपल्या आई-वडिलांच्या भरवश्यावर जम बसवलाय. ...

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे.  बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी आपल्या आई-वडिलांच्या भरवश्यावर जम बसवलाय. पण शाहरूखचे म्हणाल तर आज तो जो काही आहे, तो स्वबळावर. अनेक वर्षांचे कष्ट, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. शाहरूखने पन्नाशी ओलांडलीय, पण आजही बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. बॉलिवूडचा प्रत्येक दिग्दर्शक आणि अ‍ॅक्टर त्याच्यासोबत काम करण्याचे स्वप्न बघतो, हे त्याचमुळे. पण शाहरूखच्या मुलांचे म्हणाल तर त्याची हीच चांगली गोष्ट त्यांना आवडत नाही.होय, आम्ही बोलतोय ते शाहरूखची लाडकी लेक सुहाना खानबद्दल. शाहरूखला प्रत्येक शॉट परफेक्ट देण्याची सवय आहे. मग भलेही कितीही रिटेक होवोत. स्वत:च्या मनासारखा शॉट मिळत नाही, तोपर्यंत तो शूट करत राहतो. खरे तर हे एका निष्ठावान अभिनेत्याचे लक्षण आहे. पण ही गोष्ट सुहानाला अजिबात आवडत नाही. सुहाना अलीकडे अनेकदा डॅड शाहरूखच्या सेटवर जाते. सुहानालाही अभिनेत्री बनायचे आहे. कदाचित त्याचमुळे डॅड करून बºयाच काही गोष्टी शिकण्याचे तिचे प्रयत्न आहेत. काही महिन्यांपूर्वी सुहाना इम्तियाज अलीच्या ‘जब हॅरी मेट सेजल’च्या सेटवर गेली होती. यावेळी चित्रपटातील एका पंजाबी गाण्याचे शूट सुरु होते. या गाण्यातील एका स्टेपसाठी शाहरूखने दहा टेक घेतले. इम्तियाजला तो शॉट ओके वाटला होता. पण शाहरूखच्या मते, तो ठीक नव्हताच. मग काय, केवळ ३ सेकंदाच्या या शॉटसाठी शाहरूखने दहा टेक घेतले. सुहाना हे सगळे बघत होती. शूटींग संपल्यानंतर ती अक्षरश: वैतागलीच. तू ३ सेकंदाच्या शॉटसाठी इतके का करतोस? असे ती शाहरूखला म्हणाली. यावर बिचारा शाहरूख काय बोलणार. तो नुसता हसला. खुद्द शाहरूखने अलिकडे हा किस्सा सांगितला. माझी मुलं माझ्या या सवयीमुळे कंटाळतात, असे तो म्हणला.ALSO READ :  अन् रिअ‍ॅलिटी शोतील टास्कमुळे असा भडकला किंगखान शाहरूख खान!