Join us

स्वराचा गणितात ‘डब्बा गुल’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 12:56 IST

स्वरा भास्कर हिचा आगामी चित्रपट ‘निल बातें सन्नाटा’ मधील ‘डब्बा गुल’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 

स्वरा भास्कर हिचा आगामी चित्रपट ‘निल बातें सन्नाटा’ मधील ‘डब्बा गुल’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे शब्द ‘मॅथ्स मैं डब्बा गुल’ असे आहेत. रोहन विनायक यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे असून नितेश तिवारी यांनी याचे शब्दलेखन केले आहे.गणित शिकताना सामोरे जावे लागणाºया आव्हानांना यात धमाल आणि गमतीदार रूप देण्यात आले आहे. गाण्यात दाखवण्यात आलेले सीन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेत असताना गणिताविषयी घडत असतात. ‘निल बातें सन्नाटा’ मध्ये आई आणि मुलीचे भावविश्व दाखवण्यात आले आहे.स्त्रीशिक्षणावर आधारित चित्रपट असून यात स्वरा शिवाय रत्ना पाठक आणि पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘अम्मा कनक्कू’ या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे.">http://