‘दबंग ३’मध्ये सलमान खानसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 11:37 IST
नेक्स्ट ‘दबंग गर्ल’ कोण हा २०१७ मधील मोठा प्रश्न आहे. ‘दबंग’ आणि ‘दबंग २’नंतर आता या सिरीजमधील तिसरा भाग ...
‘दबंग ३’मध्ये सलमान खानसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
नेक्स्ट ‘दबंग गर्ल’ कोण हा २०१७ मधील मोठा प्रश्न आहे. ‘दबंग’ आणि ‘दबंग २’नंतर आता या सिरीजमधील तिसरा भाग येत आहे. अरबाज खानने घोषणा केल्यापासून या चित्रपटाविषयी कमालीची के्रझ आहे. मात्र, चित्रपटात हीरोईन कोण असणार याबद्दल अद्यापही कन्फ्युजन आहे.अशी माहिती मिळतेय की, ‘दबंग ३’मध्ये सोनाक्षी सिन्हा नसणार. त्यामुळे नव्या हीरोईनचा शोध घेतला जात आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. अखेर, एमी जॅक्सनच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याचे सुत्रांनी कळविले.►ALSO READ: सलमान खानसोबत शाहरुखची ‘पत्नी’ करणार रोमान्स?अक्षय कुमारसोबत ‘सिंग इज ब्लिंग’मध्ये झळकलेली एमी आता सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. एमीने सलमानचा भाऊ सोहेल खान निर्मिती ‘फ्रिकी अली’मध्ये काम केले होते. तेव्हापासूनच तिचे ‘खान’ कुटुंबियांशी चांगले नाते जुळले. कदाचित त्यामुळेच तिची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. ‘दबंग गर्ल’ होण्यासाठी परिणीती चोप्राचे नावसुद्धा आघाडीवर आहे. तसेच य चित्रपटात काजोल नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र, काजोलने स्वत: असे काही नसल्याचे सांगितले होते. प्रतीक बब्बर स्टारर ‘एक दीवाना था’ या चित्रपटातून एमीने चंदेरी दुनियेत पदार्पण केले होते. ►ALSO READ: काजोलने नाकारला ‘दबंग3’चा प्रस्ताव?नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये सलमानसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. ती म्हणाली की, ‘सलमान खानसोबत चित्रपट करणे हे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. ‘किक’ चित्रपटात काम करण्याची मला संधी होती मात्र त्यावेळी मी ‘आय’ नावाच्या सिनेमात व्यस्त असल्यामुळे ते शक्य झाले नाही.’निर्मात्यांकडून अद्याप स्टारकास्टविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी जानेवारीत शूटींग सुरू करून नाताळाच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज करण्याची त्यांची योजना आहे. सलमान सध्या कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ आणि यशराज बॅनरच्या ‘टायगर जिंदा है’मध्ये व्यस्त आहे. यावर्षी ‘ईद’ला ‘ट्युबलाईट’ प्रदर्शित होणार असून ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सिक्वेल आहे.