शेतात दबंगगिरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 22:01 IST
दबंग सलमान खानची दबंगगिरी रसिकांनी आजवर विविध रुपात पाहिली आहे. गुंडांशी चार हात करणारा सलमान रसिकांना चांगलाच भावला..त्याचं ...
शेतात दबंगगिरी !
दबंग सलमान खानची दबंगगिरी रसिकांनी आजवर विविध रुपात पाहिली आहे. गुंडांशी चार हात करणारा सलमान रसिकांना चांगलाच भावला..त्याचं प्रत्येक रुप रसिकांनी डोक्यावर घेतलं. असंच एक अनोखं रुप रसिकांना पाहायला मिळालं. सलमानची दबंगगिरी थेट शेतात पाहायला मिळाली. सलमाननं शेतात चक्क ट्रॅक्टर चालवला. निमित्त होतं सलमानच्या सुलतान सिनेमाच्या शुटिंगचं.या सिनेमाचं शुटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या शुटिंगच्या अखेरच्या दिवशी सलमाननं ट्रॅक्टर चालवून शेतात दबंगगिरी दाखवली. या सिनेमात हरियाणाचे कुस्तीपटू सुलतान अली खान यांची भूमिका यांची भूमिका साकारतोय.सलमानची शेतातली आणि लाल मातीतली दबंगगिरी रसिकांना तितकीच भावेल यांत शंका नाही.