Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोफिया हयातच्या इन्स्टाग्राम पोस्टने संतापले नेटकरी, दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:29 IST

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिचे आणि वादाचे खूप जवळचे नाते आहे.

ठळक मुद्देआधीही आपल्या अशा कारनाम्यांमुळे सोफियाला अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल होते. 

बिग बॉसमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री व मॉडेल सोफिया हयात हिचे आणि वादाचे खूप जवळचे नाते आहे. सोफिया हयात ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.  काही वर्षांपूर्वी ती नन बनली होती. तिने ट्विटरवरून याबाबत तिच्या फॅन्सना माहिती दिली होती. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे आपण नन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने जाहीर केले होते. यानंतर बरेच दिवस ती ननच्या वेशात वावरताना दिसली होती. मात्र काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदलला होता आणि यानंतर अचानक तर शॉर्ट कपड्यांवर आली होती. एवढेच नव्हे तर ती लग्नबंधनातदेखील अडकली होती. (अर्थात वर्षभरातच ती पतीपासूनही विभक्त झाली.) आता या बयेने असे काही केले की, सोशल मीडियावर तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली. यानंतर तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.

सोफियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर काही वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यात. यात हिंदूंसाठी पूज्य मानल्या जाणा-या ओम या धार्मिक प्रतिकासमोर आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो तिने शेअर केले.एवढेच नाही यानंतर एका हिंदू देवतेचा आक्षेपार्ह फोटोही तिने शेअर केला. तिच्या पोस्ट बघताच सोशल मीडियावर युजर्सच्या संतापाचा भडका उडाला. एका युजरने तिच्याविरोधात सायबर सेलमध्ये आॅनलाईन तक्रारही दाखल केली.

आधीही आपल्या अशा कारनाम्यांमुळे सोफियाला अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल होते. यापूर्वी सोफियाने तळव्यांवर स्वस्तिक या हिंदू प्रतिकांचा टॅटू  गोंदवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. स्वस्तिक या प्रतिकाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोफियाच्या या टॅटवर सुमारे दोनशेवर लोकांनी कमेंट देत तिच्या या कृत्याची निंदा केली होती. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची तर काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली होती. यानंतर पतीसोबतचे इंटिमेट व्हिडीओ शेअर करून ती वादात सापडली होती.

टॅग्स :बिग बॉस