Join us
Daily Top 2Weekly Top 5

थ्री इडियटसच्या सिक्वलची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:41 IST

अभिनेता आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशी यांच्या थ्री इडियटस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या ...

अभिनेता आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशी यांच्या थ्री इडियटस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दशर्क राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या सिक्वलबाबत शर्मन जोशी खूप उत्सुक आहे. राजकुमार हिरानी सध्या थ्री इडियटसच्या सिक्वलवर काम करत असल्याची त्यांनी काहीच दिवसांपूर्वी शर्मनला कल्पनाही दिली आहे. या चित्रपटाची त्यांची कथा लवकर लिहून व्हावी आणि त्यांनी चित्रीकरणाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी शर्मनची इच्छा आहे