Crazy Fans : बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘डाय हार्ड’ फॅन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 18:10 IST
अबोली कुलकर्णी अलीकडेच अभिषेक शेट्टी या दुबईतील इंजिनिअर तरूणाने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमुळे तो ...
Crazy Fans : बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘डाय हार्ड’ फॅन्स!
अबोली कुलकर्णी अलीकडेच अभिषेक शेट्टी या दुबईतील इंजिनिअर तरूणाने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमुळे तो रातोरात ‘हिरो’ झाला. का? कसा? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तुम्ही वाचताय ते अगदी खरंय.. हा तरूण शाहरूखने शूटींग केलेल्या जगातील बऱ्याच ठिकाणी जाऊन पोहोचला. आईसलँड, इंग्लंड, ग्रीस, श्रीलंका, जर्मनी, युक्रेन, फ्रान्स, थायलंड अशा अनेक ठिकाणी जाऊन त्याने मस्त फोटोसेशन केले. ‘फॅन असावा तर असा’ असे म्हणण्याची वेळ त्याने आपल्यावर आणली. नाही का ? ग्लॅमरच्या दुनियेतील या सेलिब्रिटींचे अनेक क्रेझी फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. पाहूयात, अशाच अनेकांची ही जर्नी... * आमिर खान किशोर कुमार हा आमिर खानचा खुप मोठा फॅन. त्याने आमिरला भेटण्यासाठी ‘राँची ते मुंबई’ असा सायकलवरून प्रवास केला. एवढेच नाही तर आमिरने भेटण्याचे आश्वासन देईपर्यंत तो चक्क दोन दिवस मुंबईच्या पोलिस ठाण्यात राहिला. आता फॅन म्हटल्यावर ते अशा अतरंगी हरकती तर ते करणारच. नाही का? * सलमान खान ‘बॉलिवूडचा दबंग’ सलमान खानचा फॅन कोण नाही ? पण रतन रंजन नावाचा त्याचा एक फॅन फारच वेगळा आहे. ‘अंदाज अपना अपना’ या सल्लूमियाँच्या चित्रपटाचा तो प्रशंसक असून त्याने भाईच्या ४९व्या वाढदिवसादिवशी ‘बिहार ते मुंबई’ असा सायकलप्रवास केला. त्याला भेटून शुभेच्छा दिल्यावरच तो थांबला. * कॅटरिना कैफ ‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ हिचा विनय शर्मा हा डाय हार्ड फॅन. हा मीरत येथील रोबोटिक्स प्रोफेसर आणि होतकरू कलाकार असून त्याने त्याची फेव्हरेट अभिनेत्री कॅटरिनासाठी एक गाणे बनवले. ते गाणे सादर करत असताना त्याच्या ड्रेसवर सगळीकडे कॅटरिना असे लिहिलेले होते. * दीपिका पादुकोण प्रेरणा मायनील ही एक कॉलेजगोर्इंग विद्यार्थिनी. तिने ‘मस्तानी’ला जवळपास १०० मेल्स केले. वेगवेगळया तिच्या या मेल्सनी दीपिका खुपच प्रभावित झाली. जेव्हा तिला ‘राम-लीला’ चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर अॅवॉर्ड’ मिळाला. तेव्हा दीपिकाने तिला पुरस्कार स्विकारताना स्टेजवर यायला सांगितले. * हृतिक रोशन ज्योती विश्वकर्मा या कोलकाताच्या २० वर्षीय तरूणीने हृतिक रोशनचे नाव तिच्या हातावर गोंदून घेतले होते. एवढेच नव्हे तर तिच्या या क्रेझीनेसवर फिदा होऊन हृतिकने तिला कॉफी डेटसाठी निमंत्रण दिले. * प्रियांका चोप्रासौरभ श्रीवास्तव या इंदौरच्या फॅशन डिझायनरने स्वत:च्या हाताने देसी गर्लचे ५ फूट उंचीचे चित्र रेखाटले. यामुळे प्रियांका जाम खुश झाली. तिने त्याला बोलावून त्याच्या कामाचे कौतुक केले.