Join us

CoronaVirus: प्यार का पंचनामा फेम इशिता राजने दिला चाहत्यांना केले हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 07:00 IST

इशिताने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी सगळीकडे लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत सगळेच सध्या घरातच आहे. क्वारंटाईनमध्ये ते घरात बसून स्वतःची व घराची काळजी घेत आहेत. घरातले काम जसे स्वयंपाक करणे, घरची साफ सफाई स्वतःच करत आहे आणि याचे व्हिडिओ बनवून सर्वांना घरीच थांबण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

प्यार का पंचनामा अभिनेत्री इशिता राज आपल्या दिल्लीतल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. इशिताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना व्हिडिओ शेअर आवाहन केले आहे. इशिता म्हणाली की, मला आशा आहे की प्रत्येकजण घरी सुरक्षित आणि आहे, मला माहित आहे की आपण खूपच तणावपूर्ण आणि आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत पण ह्याला आपण सर्व एकत्र हरवू शकतो आपल्या घरात बसून, सामाजिक दुरावा ठेवून ज्याने रोग प्रसारण थांबवु शकतो. माझी हीच इच्छा आहे ह्यामध्ये सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि एकमेकांचा साथ देऊन ह्या परीस्थिती पार पडावे.

ती पुढे म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 24 मार्च रोजी रात्री देशाला संबोधित करताना लोकांना कोरोनावायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला रोग फार गंभीरपणे घेण्याचे आवाहन केले.

विषाणूचा सार्वजनिक प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी 21 दिवसांचे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. सरकारने लॉकडाउन सुरू केले आहे आणि आम्हाला माहिती आहे की सर्व सेलिब्रिटी कलम १४४ गांभीर्याने घेत आहेत व त्या अनुसार चालत आहेत आणि म्हणून सर्व सामान्य सुद्धा आपल्या आवडीतल्या कलाकारानं सारख नियमाचा पालन करण्यास प्रोत्साहीत होतील.

टॅग्स :लव आजकल