Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कार्तिक आर्यनचा रॅप व्हिडिओ होतोय व्हायरल, म्हणतोय - 'कोरोना स्टॉप करो ना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 14:38 IST

कार्तिक आर्यनचा कोरोनावरील रॅप व्हिडिओ होतोय व्हायरल  

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेपासून बॉलिवूडचे कलाकारदेखील क्वारंटाईनमध्ये आहेत. आपल्या रिकाम्या वेळेत बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना कोरोना व्हायरस बचाव करण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. त्यात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने यासाठी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे.

खरेतर नुकताच कार्तिक आर्यनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कार्तिक आर्यन कोरोना व्हायरसवर रॅप करताना दिसत आहे. या व्हिडिओत कार्तिक आर्यन कोरोना व्हायरसवर रॅप करताना दिसत आहे. या रॅप व्हिडिओच्या माध्यमातून कार्तिक आपल्या चाहत्यांना सूचना करत आहे. तर कार्तिकचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना हा व्हिडिओ खूप भावतो आहे.

व्हिडिओत कार्तिक रॅप करीत पार्टी करु नका, लोकांना भेटू नका व सातत्याने हात धुण्यासाठी सांगतो आहे. त्यासोबतच कार्तिक आर्यन घरातून काम करा आणि घरासाठीदेखील काम करा असे सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, जोपर्यंत घरी बसत नाही, मी आठवण देत राहीन. कोरोना स्टॉप करो ना.

ही पहिली वेळ नाही जेव्हा कार्तिक आर्यनने कोरोना व्हायरसच्या संदर्भात पोस्ट केली आहे. यापूर्वीदेखील कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कार्तिकचा हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर करत प्रशंसा केली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकार्तिक आर्यननरेंद्र मोदी