Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या घरी या मार्गाने पोहोचला कोरोना,या स्टुडिओमध्ये गेले होते शूटसाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 12:33 IST

अभिषेकमुळे आतापर्यंत बच्चन कुटुंबीयांपर्यंत कोरोना पोहोचल्याचे बोलले जात होते पण..

बच्चन कुटुंबीय लॉकडाऊन दरम्यान घरातच होते, मग असे काय झाले की बच्चन कुटुंबापर्यंत कोरोना येऊन पोहोचला. अभिषेकमुळे आतापर्यंत बच्चन कुटुंबीयांपर्यंत कोरोना पोहोचल्याचे बोलले जात होते. काहीजणांचे म्हणणे आहे की, मुंबईतील वॉर्ड, ज्यामध्ये त्यांचे घर आहे, ते एक गंभीरपणे संक्रमित क्षेत्र आहे.

अमिताभ बच्चन सक्रिय होते

कोरोना कालावधीत, अमिताभ घरी राहत असताना देखील सतत सक्रिय होते. सोशल मीडियावर लोकांना जागरूक करण्यासाठी तो व्हिडिओ बनवत होता.कौन बनेगा करोडपतीचा प्रोमोदेखील यावेळी शूट करण्यात आला.  तो त्यांच्या घरीच  शूट करण्यात आला. परंतु काही लोक बाहेरून या शूटिंगसाठी त्यांच्या घरी आले होते का?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, गेल्या दहा दिवसांत अमिताभ एका अ‍ॅड फिल्मची डबिंग सुरु केली होती. ते या डबिंगसाठी  घराबाहेर पडून शेजारच्या बंगला जलसा येथे गेले होते. काही लोकांचे असे देखील म्हणणे आहे की, अ‍ॅड फिल्मच्या शूटिंगसाठी ते अंधेरीतल्या एका मोठ्या स्टुडिओमध्ये गेले होते. गेल्या दहा दिवसांच्या सक्रियतेमुळे बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन