ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणे आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत तिच्या अनेक फोटोंवर दिसून येते. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून तिला ओळखणेही अशक्यच आहे. अनेकांना तिचा हा विनामेकअप लूक पाहून थक्कच होत आहेत. कारण ही अभिनेत्री आहे स्वरा भास्कर.स्वरा भास्करच्या या फोटोला अनेकांना हा क्वॉरंटाईन लूक म्हणूनही तिला कमेंट केल्या आहेत. संपूर्ण लॉक डाऊन असल्यामुळे नेहमी मेकअपमध्ये दिसणा-या अभिनेत्रींचा मेकअप उतरल्याने खरा चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे स्वराची लॉक डाऊनमुळे अशी अवस्था झाली का? असेही युजर्स म्हणत आहेत.
तसेच काही दिवसांपूर्वीत स्वराविरोधात थेट कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. स्वरा धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.