Join us
Daily Top 2Weekly Top 5

COOL : करिनापाठोपाठ अनुष्का शर्माही कामावर परतली, दोन महिने आधीच सुरू केले शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:13 IST

वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का पूर्णपणे लेकीत गुंतली होती. पण आता कदाचित कामावर परतण्याची वेळ आली आहे आणि अनुष्का त्यासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर अनुष्काने महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यावर्षी 11 जानेवारीला आई झाली. अनुष्काने एका गोंडस कन्येला जन्म दिला. तिचे वामिका असे नामकरणही करण्यात आले. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का पूर्णपणे लेकीत गुंतली होती. पण आता कदाचित कामावर परतण्याची वेळ आली आहे आणि अनुष्का त्यासाठी सज्ज झाली आहे.खरे तर अनुष्का आणखी 2 महिन्यांनंतर कामावर परतणार होती. मे महिन्यात कामावर परण्याचा निर्णय तिने घेतला होता. पण आता दोन महिन्याआधीच, म्हणजे शेड्यूलच्याआधीच अनुष्का कामावर परतली आहे.

आज अनुष्का एका जाहिरातीच्या शूटसाठी सेटवर परतली. पुढील दोन दिवस ती या जाहिरातीचे शूट पूर्ण करणार आहे. यानंतर ती चित्रपटाचे शूटींग सुरु करेल, असेही मानले जातेय.

सेटवरच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का आईची जबाबदारी सांभाळण्यासोबतच काम व पर्सनल लाईफही बॅलेन्स करू शकते. वेळेची पक्की म्हणून ती इंडस्ट्रीत ओळखली जाते. अगदी वेळेच्या आधीच ती सेटवर पोहोचलेली असते.वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर, शाहरूखसोबतचा ‘झिरो’ हा अनुष्काचा अलीकडचा अखेरचा सिनेमा होता. या सिनेमानंतर अनुष्काने अद्याप नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. चर्चा खरी मानाल तर अनुष्काने महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :अनुष्का शर्मा