सैफ शिकतोयं पाककला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 19:59 IST
‘शेफ’या हॉलिवूडपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या रिमेकमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या ...
सैफ शिकतोयं पाककला
‘शेफ’या हॉलिवूडपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या रिमेकमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी सैफ अली खान प्रचंड मेहनत घेतोयं. यासाठी पाककलेचे प्रशिक्षण घेतोय. चित्रपटात त्याची भूमिका अगदी प्रोफेशनल शेफला लाजवणारी ठरावी, असेच सैफचे प्रयत्न आहेत. ‘एअरलिफ्ट’चे दिग्दर्शक राजाकृष्ण मेनन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सैफच्या अपोझिट कुठली हिरोईन दिसेल, हे अद्याप ठरलेले नाही. पण सैफ मात्र कामाला लागलाय. सुमारे दोन महिने सैफ पाककलेचे प्रशिक्षण घेणार आहे. तो पाक कला शिकेल, कुकिंग क्लास घेईल. यासाठी देशविदेशातील अनेक अनुभवी शेफ त्याला मदत करतील. ‘शेफ’हा २०१४ मध्ये आलेला अमेरिकन चित्रपट. जॉल फावरो याने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. शिवाय यात मुख्य भूमिकाही साकारली होती.