Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्ट्राव्हर्सी क्वीन पूनम पांडेने पुन्हा केले हे काम,युजर्स म्हणाले डोकं ठिकाणावर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:41 IST

ती नेहमीच छोट्या छोट्या तिच्या प्रोजेक्टची माहितीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तुर्तास पुनमचा हा फोटो बघून युजर्सचा चांगलाच संताप झाला आहे. तिच्या या फोटोला युजर्सकडून अतिशय विचित्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

पूनम पांडे हिच्या बोल्डनेसबद्दल फारसे सांगण्याची काही गरज नाही. कारण ती नेहमीच काही ना काही कारनामा करून सोशल मीडियावर आग लावत असते.पूनम सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.त्यामुळे दर दिवसाला तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. ती नेहमीच तिच्या सेक्सी अदा आणि हॉट फोटोज् शेअर करून चर्चेत राहत असते. आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर तिने नेटीझन्सनाच या फोटोसाठी कॅप्शन देण्याची मागणी केली आहे.पूनमचा हा फोटो पाहताच नेटीझन्सने मात्र तिला चांगलेच शाब्दीक बोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. पुनम पांडेला नेहमी लाईमलाईटमध्ये राहायला आवडते.त्यामुळे फारसे करण्यासारखे काही नसल्यामुळे ती अशा गोष्टी करत सा-यांचे लक्षवेधण्याचे काम करत असते.या टॉपलेस फोटोमुळे युजर्सनी पुन्हा एकदा तिला ट्रोल्स करण्यास सुरुवात केली आहे.वास्तविक पूनम पांडे जेव्हा जेव्हा असा काही धमाका करीत असते त्याची माहिती सर्वात अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असते.तसेच ती नेहमीच छोट्या छोट्या तिच्या प्रोजेक्टची माहितीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तुर्तास पुनमचा हा फोटो बघून युजर्सचा चांगलाच संताप झाला आहे.तिच्या या फोटोला युजर्सकडून अतिशय विचित्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पूनम पांडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहे.पूनमसोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूरही ब-याच वर्षांनंतर बघावयास मिळणार आहे.या चित्रपटाचे नाव ‘द जर्नी आॅफ कर्म’ असे असून, त्यामध्ये पूनम आणि शक्तीची जोडी बघावयास मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये पूनम पांडेचा पुन्हा एकदा हॉट अंदाज बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पूनमने तिचा एक अ‍ॅप लॉन्च केला होता. परंतु गुगलने तो स्टोअर प्लेवरून काढून टाकला. मात्र सोशल मीडियावर हॉट व्हिडीओ आणि फोटो अपलोड करण्याचा तिचा सिलसिला सुरूच आहे.