Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ बधाई हो बधाई...टायगर हुआ है... ; अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 11:16 IST

होय, महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढलीय. याचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना प्रचंड आनंद झालाय. मग काय? ‘बधाई हो बधाई...टायगर हुआ है...’असे म्हणत ते वनअधिकाºयांना मिठाई वाटत सुटले आहेत.

मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या सगळ्यांना मिठाई वाटताना दिसत आहे. कशाबद्दल तर, वाघ वाढल्याबद्दल. होय, महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढलीय. याचा अमिताभ यांना प्रचंड आनंद झालाय. मग काय? ‘बधाई हो बधाई...टायगर हुआ है...’असे म्हणत ते वनअधिकाºयांना मिठाई वाटत सुटले आहेत. महाराष्ट्र, वनविभागाद्वारे जारी करण्यात आलेला अमिताभ यांचा हा व्हिडिओ खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आणि मग तो प्रचंड वेगाने व्हायरल  झाला.महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली आहे, ही आनंदाची बातमी पेरणारा हा व्हिडिओ म्हणेज, ‘वाघ वाचवा’ मोहिमेचे फलित आहे. महाराष्ट्र काही काळापूर्वी वाघांची संख्या अचानक कमी झाली होती. यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहिम सुरु करण्यात आली होती. महानायक अमिताभ बच्चन व भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत होऊन वन पर्यटनासोबत व्याघ्र संरक्षणाला चालना द्यावी, अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अमिताभ यांनी ही तात्काळ ही विनंती मान्य केली होती.  यानंतर अमिताभ यांनी ‘वाघ बचाओ’ मोहीमेला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगांव-नागझिरा व बोर या तसेच सहा व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत म्हणून त्यांनी काम केले होते. अमिताभ बच्चन यांनी चंद्रपुरातून वाघ बचाओ मोहिमेचा प्रारंभ केला होता.याच मोहिमेचे फळ आता मिळाले आहे.ALSO READ : बिग बी म्हणतात, माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती...!सन  २००६ मध्ये राज्यात १०३ वाघ होते. २०१० मध्ये १६९ व २०१४ मध्ये १९० वाघ होते.  यातही चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे.