Join us

बधाई हो ! आयुष्मान खुराणा आणि सन्या मल्होत्राने सुरू केली आगामी चित्रपटाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 14:33 IST

आयुष्मान खुराणा आपल्या आगामी चित्रपटासाठी तयार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दंगलमध्ये आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारणारी सान्या मल्होत्रा ...

आयुष्मान खुराणा आपल्या आगामी चित्रपटासाठी तयार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दंगलमध्ये आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारणारी सान्या मल्होत्रा यात दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आहे बधाई हो असे आहे. दोघांनी चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचायला आणि वर्कशॉपची तयारी सुरु केली आहे. याची माहिती आयुष्यमानने स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. आयुष्मान आपल्या आगामी चित्रपटाला घेऊन उत्साहित आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. आमचा हा प्रवास मजेदार होणार आहे. सान्या मल्होत्राने आयुष्मानच्या या ट्विटरवर डान्सिंगची इमोज देत रिप्लाय केला आहे.     
सान्या या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणाली, मी एक अभिनेत्री होऊन खूप खूष आहे. जेव्हा कधी एखाद्या इंटरेस्टिंग प्रोजेक्ट माझाकडे येतो त्यावेळी मी तो स्वीकारण्याचा पूर्ण प्रयत्न करते. 'बधाई'मधील माझी भूमिका दंगल मधल्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. यात मी कुस्ती खेळताना दिसणार नाही आहे.'बधाई'चे दिग्दर्शन अमित शर्मा करणार आहे. या आधी त्यांने अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट 'तेवर'चे दिग्दर्शन केले आहे.  ‘जंगली पिक्चर्स’ने या चित्रपटासाठी सान्याला कास्ट केले आहे. 
सान्या मल्होत्राने 2016 मध्ये आलेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या  बबिता फोगटच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. 'बधाई'मध्ये ती आयुष्मानसोबत रोमांस करताना दिसणार आहे.‘बधाई हो’  हा एक फॅमिली ड्रामा आहे.या कुटुंबाला अचानक एक बातमी मिळते आणि या बातमीने अख्खे कुटुंब तणावात येतात. सगळे जण आपआपल्यापरिने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.
काही दिवसांपूर्वी सान्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने एकच धूम सोशल मीडियावर उडवून दिली होती.