Join us  

Confirmed! सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा', रिलीज होणार इथे आणि या दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 5:03 PM

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना व चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान सुशांतचे चाहते त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा थिएटरमध्ये रिलीज करा अशी मागणी करत होते. मात्र आता त्याचा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे. डिज्नी हॉटस्टारवर दिल बेचारा हा चित्रपट 24 जुलैला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्राने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे.

सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट हॉलिवूडपट द फॉल्ट इन अवर स्टार्सचा रिमेक आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राने केले आहे. विशेष बाब म्हणजे मुकेश छाब्रानेच सुशांतला काय पोछे चित्रपटात हिरो म्हणून कास्ट केले होते.

सुशांत व मुकेश दोघेही चांगले फ्रेंड होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर मुकेश छाब्राने पोलिसांना सांगितले की, त्याने सुशांतला वचन दिले होते की जेव्हा कास्टिंग डिरेक्टरनंतर डिरेक्टर बनेन तेव्हा पहिल्या सिनेमात हिरो म्हणून तुला कास्ट करेन. मुकेश छाब्राने दिल बेचाराच्या माध्यमातून आपले वचन पूर्ण केले.

दिल बेचारा सिनेमा यावर्षी मे मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा चित्रपट डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला ए.आर रेहमानने संगीत दिले आहे आणि यातील गाणी अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत