Join us

Confirmed! आमिर खानच्या सरफोरशच्या सीक्वलमध्ये दिसणार जॉन अब्राहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:00 IST

'सरफरोश' सिनेमाचा सीक्वल तब्बल १९ वर्षांनंतर येतो आहे आणि यात आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे.

ठळक मुद्दे 'सरफरोश' सिनेमाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे

काही दिवसांपूर्वी पूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की आमीर खानच्या 'सरफरोश' सिनेमाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. जॉन म्हैथ्यू दिग्दर्शित हा सिनेमा १९९९ला  प्रदर्शित झाला होता. आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नासरुद्दीन शाह यांच्या या सिनेमातील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते, सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. आता तब्बल १९ वर्षांनंतर ह्या सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झाली आहे आणि ह्या सिनेमात आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे आणि हे स्वतः जॉन ने सांगितले आहे.

जॉनने दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मी या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची निर्मिती जॉन मैथ्यू मदान आणि मी एकत्रपणे करणार आहे. सध्या आम्ही पटकथेवर काम करत आहोत. येणाऱ्या वर्षात हा सिनेमा फ्लोरवर जाईल, जॉन मदान हा एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याला मी सरफारोश पाहून त्याच्या घरी जाऊन म्हटले "मॅन व्हॉट अ फिल्म"' आमिर खानच्या सरफरोशने फक्त प्रेक्षकांची मने नाही जिंकली तर तर ह्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ह्या सिनेमात आमिर खानची भूमिका साकारण्याबाबत जॉनला विचारले असता तो म्हणाला "मी फार उत्साहित आहे मी आमिर खानचा चाहता आहे त्यांची भूमिका करणे माझ्यासाठी आव्हानच आहे पण ह्या सिनेमाची लय एकच आहे जी 'सत्यमेव जयते' आहे.  जॉनने या वर्षी परमाणू सारखे चांगले सिनेमा तयार केला. त्याचबरोबर येत्या १५ ऑगस्टला जॉन चा 'सत्यमेव जयते' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ह्याव्यतिरिक्त जॉनकडे अजून दोन सिनेमा आहेत ते म्हणजे  "बाटला हाऊस आणि रॉ : रोमिओ अकबर वॉल्टर. हे सगळे सिनेमा अॅक्शनने भरलेले आहेत. रॉमध्ये तर जॉन आहे गुप्तहेर साकारत आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे.

टॅग्स :जॉन अब्राहमआमिर खान