Join us
Daily Top 2Weekly Top 5

​confirm !! अखेर नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार ‘मंटो’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 12:51 IST

अखेर ‘मंटो’ची भूमिका कोण साकारणार, हे ठरलेच. नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोची भूमिका साकारणार आहे. पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटोवर ...

अखेर ‘मंटो’ची भूमिका कोण साकारणार, हे ठरलेच. नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोची भूमिका साकारणार आहे. पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटोवर एक चित्रपट बनवणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून होती. यात नवाजुद्दीन असणार, अशीही चर्चा होती. पण याबद्दल अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर आज ही घोषणा झालीच. चित्रपटाचा फर्स्ट लूक आज जारी करण्यात आला. यात एका कागदावर ‘मंटो आज भी हमारे साथ है और कल भी. वे जो हमारे बाद आएंगे, उसे अपने साथ पाएंगे...आजाद कलम से... ’असे  लिहिलेले आहे. अर्थात हा फोटो नवाजच्या लुक-टेस्टचा आहे. }}}}कदाचित मंटो कोण होता, हे तुम्हाला ठाऊक नसेल. सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांच्या सर्व कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्रय, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरणाºया आहेत. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना भारताच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतर फुटकळ साहित्य लिहिले. ‘अगर आपको मेरी कहानियां काबिल ए बर्दाश्त नहीं लगती है, तो वा इसलिए क्योंकि ये वक्त, ये दौर ही काबिल ए बर्दाश्त नहीं है,’असे मंटो नेहमी म्हणायचे. मंटो यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील समराला इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर इथे झाले. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी व्हिक्टर ह्युगो यांच्या The Last Days of a Condemned Man या कादंबरीच्या अनुवादाने केली. या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर व्हिक्टर ह्यूगो, मॅक्झिम गॉर्की, आंतोन चेखव, इत्यादि फ्रेंच व रशियन लेखकांचा प्रभाव होता.भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये मुंबई सोडून लाहोरला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले. मंटो यांचा मृत्यू जानेवारी १८, १९५५ रोजी लाहोर इथे झाला.