Join us

कन्फर्म! फरहान अख्तरच्या हातात हात घालून फिरताना दिसली शिबानी दांडेकर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 13:05 IST

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचा ब्रेकअप आता जुनी गोष्ट झाली. आता तर फरहान व श्रद्धा दोघेही बरेच पुढे गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर दोघांच्याही आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्रीही झालीय.

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचा ब्रेकअप आता जुनी गोष्ट झाली. आता तर फरहान व श्रद्धा दोघेही बरेच पुढे गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर दोघांच्याही आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्रीही झालीय. तूर्तास फरहानच्या आयुष्यात असलेल्या तरूणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही तरूणी आहे, मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर. होय, गेल्या काही दिवसांपासून फरहान व शिबानी दांडेकरच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहे. कालपर्यंत या केवळ चर्चा होत्या. पण कदाचित आता ही बातमी कन्फर्म झालीय.

नुकताच शिबानीचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाला इन्स्ट्रावर फरहानने लव्हची इमोजी शेअर केली होती. आताशिबानीनेही एका व्यक्तिसोबतचा हातात हात घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोतली व्यक्ती दुसरी कुणी नसून फरहान अख्तर आहे. आता हा फोटो पाहिल्यानंतर फरहान व शिबानीच्या नात्याबद्दल वेगळे काही सांगायची गरजचं उरली नाही.

२०१५ पासून फरहान व शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानीही त्या शोचा भाग होती़ पुढे त्यांची मैत्री झाली आणि आताश: हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय. आता दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही.फरहान हा घटस्फोटित आहे. दोन मुलांचा बाप आहे. तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर  गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती.   ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. 

टॅग्स :फरहान अख्तर