Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirm : ‘साहो’मधून अनुष्का शेट्टीचा पत्ता कट; आता या अभिनेत्रीबरोबर प्रभास करणार रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 17:25 IST

‘बाहुबली’ फेम प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शेट्टीचे नाव आघाडीवर होते. ‘बाहुबली’नंतर ‘साहो’मध्येही प्रभास आणि ...

‘बाहुबली’ फेम प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शेट्टीचे नाव आघाडीवर होते. ‘बाहुबली’नंतर ‘साहो’मध्येही प्रभास आणि अनुष्काची जोडी पुन्हा एकदा रोमान्स करताना प्रेक्षकांना बघावयास मिळणार होती. परंतु आता आलेल्या माहितीनुसार ‘साहो’मधून अनुष्काचा पत्ता कट करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का शेट्टीचे ५ ते ६ किलो वजन वाढले होते. निर्मात्यांनी तिला एका ठरावीक काळापर्यंत वजन कमी करण्याचे सांगितले होते. परंतु अनुष्का प्रचंड मेहनत घेतल्यानंतरही वजन कमी करू शकली नसल्याने निर्मात्यांनी तिचा पत्ता कट केला आहे. आता अनुष्काची जागा एक नव्या दमाची अभिनेत्री घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या नावाचा सध्या विचार केला जात आहे. काही काळापूर्वी पूजाला हृतिक रोशनबरोबर ‘मोहनजोदाडो’ या चित्रपटात प्रेक्षकांनी बघितले होते. आता पूजा ‘साहो’मध्ये प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. वास्तविक अद्यापपर्यंत पूजाच्या नावाची अधिकृत घोषणा केली गेली नाही; मात्र निर्माते पूजाच्या नावावर विचार करीत असल्याचे निश्चित आहे. जर पूजाला या चित्रपटात संधी दिल्यास पहिल्यांदा पूजा आणि हृतिकची जोडी पडद्यावर बघावयास मिळणार आहे.  वृत्तानुसार प्रभास या चित्रपटाच्या शूटिंगला आॅगस्ट महिन्यापासून सुरुवात करणार आहे. असे म्हटले जात आहे की, ‘साहो’ हा चित्रपट वर्तमानकाळापेक्षा तांत्रिक प्रगल्भ असेल. ज्यामध्ये प्रेक्षकांना अनेक आश्चर्यचकित करणाºया गोष्टी बघावयास मिळू शकतात. चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असतील. दरम्यान, पूजाचे नाव जर निश्चित झाले तर ती अनुष्काची जागा घेण्यास योग्य ठरेल काय? प्रेक्षक अनुष्काऐवजी पूजाला पसंत करतील काय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. पण काहीही असो, पूजा हेगडेचा आतापर्यंतचा प्रवास पाहता ती या चित्रपटाला न्याय देऊ शकेल, असे म्हटले तर घाईचे ठरू नये.