Join us

Confirm : अनिल कपूर, श्रीदेवी स्टारर ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 19:29 IST

गेल्या काही दिवसांपासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता या चर्चेला बळ मिळाले असून, अभिनेत्री ...

गेल्या काही दिवसांपासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता या चर्चेला बळ मिळाले असून, अभिनेत्री श्रीदेवीने ‘जुडवा-२’नंतरच मिस्टर इंडियाच्या सीक्वलला सुरुवात केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. श्रीदेवीचे पती बोनी कपूर पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया’चा थरार घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात बºयाचशा वेगळ्या गोष्टी बघावयास मिळणार असून, त्यावर सध्या जोरदार काम सुरू आहे. सुरुवातीला ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलची निर्मिती केली जाणार की नाही? जर करण्याचा विचार केल्यास अनिल कपूरच्या भूमिकेसाठी कोणत्या यंग स्टारचा विचार केला जाईल? मोगॅँम्बो साकारणारे दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांच्या भूमिकेला तोडीस तोड खलनायक कोण साकारणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु या प्रश्नावर विचार होईल तेव्हा होईल, कारण सीक्वल येईल हे निश्चित आहे. अभिनेत्री श्रीदेवीनेच याबाबतचे संकेत दिले असून, लवकरच ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलला सुरुवात केली जाणार आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना अभिनेत्री श्रीदेवीने म्हटले की, मी मिस्टर इंडिया या चित्रपटाच्या खूप क्लोज आहे. माझ्या चित्रपटापैकी हा एक बेस्ट चित्रपट असल्याचे तिने सांगितले. जेव्हा श्रीदेवीला अनिल कपूरबरोबर तू पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार काय? असे विचारण्यात आले तेव्हा तिने यावर बोलणे जरा घाईचे ठरेल असे उत्तर दिले. मी फक्त एवढेच सांगू शकेल की, ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलची निर्मिती केली जाईल. कारण जेव्हा-केव्हा मी आणि माझे पती भेटतो तेव्हा आम्ही सीक्वलवर चर्चा करीत असतो. माझी अशी इच्छा आहे की, बोनी यांनीच हा चित्रपट करावा. शिवाय मला असा विश्वासही आहे की, बोनीच हा चित्रपट करतील. दरम्यान, ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाने त्याकाळी धूम उडवून दिली होती. चित्रपटात ज्या लहान मुलांनी काम केले होते, आज ते सर्व मुले मोठे झाले आहेत. काही इंडस्ट्रीमध्येच आहेत, तर काहींनी वेगळी वाट निवडली आहे. चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूरची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. दोघांवर चित्रित करण्यात आलेले ‘काँटे नहीं कटते’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.