ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम यांचा सिनेमा साईन केल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. पण आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झालेय. होय, खुद्द ऐश्वर्याने ही बातमी कन्फर्म केलीय. कान्स २०१९ दरम्यान अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने या चित्रपटाबद्दलचा खुलासा केला. मणिरत्नम यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मी हा चित्रपट साईन केला आहे. मी मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करणार, हे मी आता सांगू शकते. त्यांच्यासोबत काम करण्यास मी कायम उत्सुक असते. कारण ते माझे गुरु आहेत, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली. अर्थात यापेक्षा अधिक तपशील देण्यास तिने नकार दिला.
कन्फर्म! ऐश्वर्या राय बच्चनने अखेर साईन केला मणिरत्नम यांचा सिनेमा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 08:00 IST
ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम यांचा सिनेमा साईन केल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. पण आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झालेय. होय, खुद्द ऐश्वर्याने ही बातमी कन्फर्म केलीय.
कन्फर्म! ऐश्वर्या राय बच्चनने अखेर साईन केला मणिरत्नम यांचा सिनेमा!!
ठळक मुद्दे२०१८ मध्ये ऐश्वर्याचा ‘फन्ने खां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.