Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पहिल्या भेटीतच सुनील दत्त यांची झाली होती अशी अवस्था... नर्गिस यांना पाहून निघाले नाही तोंडातून शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 15:04 IST

सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मदर इंडिया या चित्रपटानंतर काहीच महिन्यांमध्ये लग्न केले. पण त्या दोघांची पहिली भेट कुठे ...

सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मदर इंडिया या चित्रपटानंतर काहीच महिन्यांमध्ये लग्न केले. पण त्या दोघांची पहिली भेट कुठे झाली होती हे तुम्हाला माहीत आहे का? नर्गिस आणि सुनील दत्त यांची पहिली भेट झाली त्यावेळी नर्गिस या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या तर सुनील दत्त यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात देखील केली नव्हती. नर्गिस यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्यांना खरी ओळख ही तकदीर या चित्रपटानंतर मिळाली. नर्गिस यांनी राज कपूर यांच्यासोबत बरसात, श्री ४२०, अंदाज, चोरी चोरी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्या काळात राज कपूर आणि त्यांची जोडी प्रचंड प्रसिद्ध होती. एवढेच नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील ते नात्यात होते. राज कपूर यांचे लग्न होऊन त्यांना मुले होती तरीही राज यांचे नर्गिस यांच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. राज यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन नर्गिस यांच्याशी लग्न करावे अशी नर्गिस यांची इच्छा होती. पण राज कपूर आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हते. त्यामुळे नर्गिस यांनी अनेक वर्षांचे नाते तोडले. नर्गिस आणि सुनील दत्त यांनी मदर इंडिया या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान लागलेल्या आगीतून सुनील दत्त यांनी नर्गिस यांना वाचवले होते. त्यानंतर काहीच महिन्यात सुनील दत्त आणि नर्गिस यांनी लग्न केले. सुनील दत्त यांना नर्गिस अनेक वर्षांपासून आवडत होती. त्यांच्यासोबत आपले कधी लग्न होईल याचा विचार देखील त्यांनी कधी केला नव्हता. सुनील दत्त यांनी बॉलिवूड मध्ये करियरला सुरुवात करण्याआधी ते रेडिओ सिलॉनवर काम करत होते. त्यांच्या आवाजाचे अनेकजण चाहते होते. रेडिओ आरजे म्हणून काम करत असताना आपली आवडती नायिका नर्गिसची एकदा तरी मुलाखत घ्यायला मिळावी अशी सुनील दत्त यांची इच्छा होती आणि एकदा त्यांना नर्गिस यांची मुलाखत घ्यायची संधी देखील मिळाली होती. पण सुनील दत्त इतके नव्हर्स झाले होते की, ते एक शब्द देखील नर्गिस यांच्यासमोर बोलू शकले नाहीत आणि त्यामुळे मुलाखतच रद्द करावी लागली होती. Also Read : या अभिनेत्रीमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा... राजीवने राज यांच्या अंत्यसंस्काराला देखील लावली नव्हती हजेरी