Join us

करीना कपूरने लग्नाआधी सैफ अली खानला घातली होती ही अट, अभिनेत्याने मान्य केल्यावर लग्नासाठी दिला होता होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 13:08 IST

सैफ अली खान आणि करीना कपूरने काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग, २०१२ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खानसाठी २०२१ खूप खास ठरले. करीना आणि सैफ या वर्षी फेब्रुवारीत दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाआधीचा इंटरेस्टिंग किस्सा ऐकायला मिळतो आहे. सैफ आणि करीनाचे लग्न २०१२ साली झाले होते. असे सांगितले जाते की सैफसोबत लग्न करण्याआधी करीनाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीनाने सैफला म्हटले होते की, ती फक्त या अटीवर लग्न करेल की लग्नानंतर तिलादेखील काम करायला परवानगी दिली पाहिजे. करीनाने सैफला स्पष्ट सांगितले होते की, मी लग्नानंतर काम करणार, पैसे कमावणार आणि तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल. करीनाची ही अट सैफने मान्य केली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले.

ओमकारा चित्रपटानंतर दोघांना टशन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा सैफ पूर्णपणे करीनावर लट्टू झाला होता. त्याला कळले होते की करीनावर त्याचे खूप प्रेम आहे आणि मग त्याने तिला प्रपोझ केले.

अखेर दोघे रिलेशनशीपमध्ये आले. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग, २०१२ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे झाले आहेत आणि दोघे सुखी विवाहित जीवन जगत आहेत. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर