COMMANDO 2 NEW SONG: नव्या अंदाजात दिसणार ‘हरे कृष्णा, हरे राम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:08 IST
बॉलीवूडमध्ये क्रिएटिव्हिटी संपली आहे की, निर्माते-संगीतकार आळशी झाले आहेत हेच कळत नाही. जुन्याच गाण्यांना रिक्रिएट करून सादर करण्याचा ट्रेंड ...
COMMANDO 2 NEW SONG: नव्या अंदाजात दिसणार ‘हरे कृष्णा, हरे राम’
बॉलीवूडमध्ये क्रिएटिव्हिटी संपली आहे की, निर्माते-संगीतकार आळशी झाले आहेत हेच कळत नाही. जुन्याच गाण्यांना रिक्रिएट करून सादर करण्याचा ट्रेंड २०१७मध्येही सुरूच आहे. ‘ओक जानू’, ‘काबील’, ‘रईस’नंतर आता ‘कंमाडो २’ या अॅक्शनपटातही एक जुने हिंदी गाणे नव्या अंदाजात वापरण्यात आले आहे.बरं हे गाणे काही फार जुने नाही, एवढेच काय ते वैशिष्ट्य. २००७ साली आलेल्या अक्षय कुमारच्या ‘भुलभुलैया’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘हरे कृष्णा, हरे राम’ हे गाणे ‘क मांडो २’ चित्रपटात वापरण्यात आले असून नुकतेचे ते इंटरनेटवर दाखल झाले आहे. विद्युत जामवाल स्टारर या अॅक्शन चित्रपटातील लाँच करण्यात आलेले हे पहिले गाणे आहे.►ALSO READ: विद्युत जामवालचा अॅक्शनपट ‘कमांडो २’ चा ट्रेलर आऊटगाण्याची कोरिओग्राफी फिरोज खान यांनी केलेली असून मुंबईच्या मेहबुब स्टुडिओमध्ये पाच दिवसांच्या कालावधीत ते चित्रित करण्यात आले. गोल्ड, ब्लॅक आणि गॉथिक पद्धतीच्या थीमवर गाण्याचा व्हिडिओ बनवण्यात आला असून मूळ गाण्याच्या संगीत रचनेत अधिक बीट्स देण्यात आले आहेत.‘कमांडो’ (२०१३) सिनेमाचा सिक्वेल असणाऱ्या या चित्रपटात विद्युतसह अदा शर्मा आणि इशा गुप्ता या अभिनेत्री आहेत. मध्यंतरी अशी चर्चा होती की, ‘क मांडो २’मध्ये संजय दत्त-माधुरी दीक्षित स्टारर ‘थानेदार’ चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे वापरण्यात येणार. परंतु, नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या ट्रेलरमध्ये हे गाणे वापरलेले आहे.► ALSO READ: ‘कमांडो २’मध्ये दिसणार काळ्या पैशांवरील सर्जिकल स्टाईक‘ओके जानू’ चित्रपटात ‘हम्मा हम्मा’, ‘काबील’मध्ये ‘हसीनो को दीवाना’ तर ‘रईस’मध्ये ‘लैला मै लैला’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले होते. जुन्या गाण्यांना आजच्या तरुणाईनुसार अंदाज देऊन वापरण्यचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरू आहे. यामुळे सिनेमाकर्त्यांच्या सृजनशीलतेवर शंका घेतल्या शिवाय पर्याय नाही.