Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विनोदी टिवटिवाट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:40 IST

सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याचे सगळ्यात पॉवरफूल माध्यम म्हणजे ट्विटर. केवळ १४० शब्दांत येथे कोणाला ‘हीरो टू झिरो’ ...

सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याचे सगळ्यात पॉवरफूल माध्यम म्हणजे ट्विटर. केवळ १४० शब्दांत येथे कोणाला ‘हीरो टू झिरो’ तर कोणाला ‘झीरो टू हीरो’ बनवता येते. सध्या गाजत असलेल्या पाकिस्तानी व्हिसा प्रकरणामुळे अनुपम खेर यांच्यावर लोकांनी फार मजेशीर ट्विट करून टीका केली आहे.मंगळवारी सकाळी बातमी आली की, पाकिस्तान सरकारने अनुपम खेर यांना कराची साहित्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी व्हिसा नाकारला आणि सगळेकडे चर्चेचे वादळ सुरू झाले. नंतर पाकिस्तान हाय कमिशनने खुलासा केला की, खेर यांनी व्हिसाची औपचारिक मागणीच केलेली नव्हती. यावर यू-टर्न घेत अनुपम म्हणाले की, कराची साहित्य महोत्सवाच्या आयोजकांनी व्हिसाची मागणी केली परंतु सरकारने ती नाकारली. आता या विषयावर ट्विटरवर काही फार मजेशीर ट्विट आले आहेत. त्यांपैकीच हे काही निवडक ट्विटस : १. अनुपम खेर यांचा तमाशा आता दर आठवड्याला नाही तर डेली सोपसारखा रोज सुरू झाला आहे.२. मला वाटले होते की, किरण बेदी या बीजेपीसोबत घडलेली सर्वात वार्ईट गोष्ट होती; पण अनुपम खेर यांनी मला चुकीचे ठरविले.३. काय विरोधाभास आहे बघा. व्हिसा नाकारला म्हणून भारतीय आनंदी तर कराची साहित्य महोत्सवाचे आयोजक दु:खी झाले आहेत.४. आजकाल साहित्य संमेलन किंवा साहित्य महोत्सव साहित्यापेक्षा भलत्याच कारणासाठी प्रकाश झोतात येतात.