Join us

​राणी मुखर्जी या चित्रपटातून करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 15:31 IST

तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर परत येण्याची तयारी करीत आहे. राणीचा अखेरचा चित्रपट ...

तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर परत येण्याची तयारी करीत आहे. राणीचा अखेरचा चित्रपट मर्दानी २०१४ साली रिलीज झाला होता. आता पुन्हा एकदा ती अभिनयात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. आगामी हिचकी या चित्रपटातून ती कमबॅक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यश राज फिल्म्सचे प्रमुख निर्माता व दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्याशी विवाह झाल्यावर राणी अभिनयातून विराम घेणार अशा चर्चा होत्या, मात्र लग्नानंतरही राणीने अभिनय कायम ठेवत मर्दाणी हा चित्रपट केला होता. यात ती एका पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान डिसेंबर २०१५ मध्ये राणीने एका मुलीला जन्म दिला. आता तिची मुलगी एका वर्षाची झाली असून राणीने बॉलिवूडमध्ये कमबॅकसाठी प्रयत्न चालविले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी हिचकी या चित्रपटात राणी हिची प्रमुख भूमिका असेल असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी हा चित्रपट इमरान हाश्मी आणि अभिषेक बच्चन यांना आॅफर करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा देखील हिरोला ध्यानात ठेवून लिहण्यात आली होती. मात्र, जेव्हा या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय आदित्य चोप्राने घेतला तेव्हा त्यांनी या चित्रपटाची कथा नायिकेवर आधारित असावी असे मत व्यक्त केले. या चित्रपटासाठी त्याने राणी मुखर्जी हिचे नाव सुचविले. या चित्रपटा राणी अशा एका मुलीच्या रूपात दिसणार आहे जी बोलताना खूप जोराने ओेरडते. लग्नानंतर मुलीच्या जन्माच्या आधीपासून तब्बल राणी दोन वर्षे लाइमलाईट पासून दूर होती. तर आदित्य चोप्राने मागील वर्षी तब्बल आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर बेफि क्रे या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केले. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नसला तरी देखील २१ व्या शतकातील प्रेम यासंदर्भातून या चित्रपटाने चांगलीच चर्चा मिळविली.