Join us

​कॉकटेलची प्रसिद्ध अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 16:29 IST

कॉकटेल चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी डायना पेंटी ही अभिनेत्री काही वर्षानंतर आनंद एल रायच्या बॅनरखालच्या आगामी ‘हॅप्पी भाग ...

कॉकटेल चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी डायना पेंटी ही अभिनेत्री काही वर्षानंतर आनंद एल रायच्या बॅनरखालच्या आगामी ‘हॅप्पी भाग जायगी’ या चित्रपटातून पुनरागमन करीत आहे. २०१२ मध्ये ‘कॉकटेल’ चित्रपटानंतर हा डायनाचा दुसरा चित्रपट असेल. या चित्रपटात डायना सोबतच अभय देओलदेखील पुनरागम करीत आहे. याअगोदर अभयला २०१४ मध्ये ‘वन बाय टू’मध्ये पाहण्यात आले होते. ‘हैप्पी भाग जाएगी’ मध्ये अली फजल आणि जिम्मी शेरगिल देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट १९ आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.