क ल्की म्हणते, ‘ कोंकणा करतेय मला मदत ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:18 IST
कल्की कोचलिन आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यातील मैत्री वाढलेली दिसतेय. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शनाच्या ...
क ल्की म्हणते, ‘ कोंकणा करतेय मला मदत ’
कल्की कोचलिन आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यातील मैत्री वाढलेली दिसतेय. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवते आहे. आणि तिचा आगामी चित्रपट आहे,‘ अ डेथ इन द गुंज ’ येतोय. कोंकणा सेन शर्मा कल्कीच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणते,‘ कल्की ही एक कोलकात्यातील अँग्लो इंडियन युवतीची भूमिका करत आहे.तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून चित्रपटाचा दर्जा आणि वळण हे तिच्या भूमिकेमुळे मिळते. ’ तसेच कल्की देखील कोंकणा सेन शर्मा विषयी म्हणते की,‘ कोंकणा ही प्रथमच दिग्दर्शक म्हणून काम पाहतेय. पण ती सेटवर सर्व व्यवस्थितपणे मॅनेज करते. तिचा हा प्रथम चित्रपट आहे. प्रत्येकाची भूमिका आणि सर्वांचे कपडे, ड्रेस यांच्याकडे ती स्वत: पाहते. ती मला अँग्लो-इंडियन भाषा बोलण्यासाठी मदत करतेय. ’