Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या हाती लागला हॉलिवूडचा आणखी एक मोठा प्रोजेक्ट, जॉन सीनासोबत शेअर करणार स्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:54 IST

पीसीच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

प्रियंका चोप्रा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब आहे, परंतु ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये आपल्या टॅलेंट दाखवताना दिसतेय. देसी गर्ल लवकरच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, ज्याचं अभिनेत्री भारतातही जोरदार प्रमोशन करत आहे. पीसीच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रियंकाने WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा प्रोजेक्ट साईन केला आहे.

प्रियंका चोप्राने तिच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. अभिनेत्री आता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हा हॉलिवूड चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झालाय.अभिनेत्रीच्या या घोषणेने चाहते किती खूश आहेत, हे पोस्टवर येणाऱ्या लाईक्सवरून कळू शकते. प्रियांकाच्या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले असून हा आकडा झपाट्याने वाढत आहे.  या चित्रपटाचे प्लॉट आणि गोष्ट काय असणार आहे हे अद्याप समजलं नाही.

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी ही अभिनेत्री भारतात आली आहे. रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या मालिकेच्या प्रीमियरमध्ये प्रियंकासह तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेन होता. प्रियांका चोप्रा जोनास ज्यांच्याकडे 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि हॉलिवूड चित्रपट आणि 2 मालिका आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूड