चंकी पांडेचा पुतण्या झाला साक्षी चोप्राच्या बिकिनीतील फोटोंवर लट्टू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 16:12 IST
साक्षी चोप्राचे बिकिनी फोटो पाहून चंकी पांडेचा पुतण्या अहान चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने साक्षीचे हॉट बिकिनीतील फोटो पाहून मुलांची रिअॅक्शन कशी असते हे दाखविले आहे.
चंकी पांडेचा पुतण्या झाला साक्षी चोप्राच्या बिकिनीतील फोटोंवर लट्टू!
साक्षी चोप्रा आता सोशल मीडिया सर्कलवर लोकप्रिय नाव आहे. तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे तिने इन्स्टाग्रामवर चांगलेच फॉलोवर्स मिळवलेले आहेत. तिच्या चाहत्यांमध्ये आता चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेची भर पडली आहे.साक्षीचे बिकिनीतील फोटो पाहून तो चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने साक्षीचे हॉट बिकिनीतील फोटो पाहून मुलांची कशी रिअॅक्शन असते हे दाखविले आहे.आता अहानने असा व्हिडिओ तयार करून उघड उघड साक्षीच्या बिकिनी फोटोंच्या प्रेमात पडल्याची एका अर्थाने कबुलीच दिली असेच म्हणावे लागेल. परंतु अहानचा असा विनोद साक्षीला मुळीच रुचला नाही. त्यामुळे अहानने तो व्हिडियो डिलिट केला. ‘रामायण’ मालिकेचे सर्वेसर्वा रामानंद सागर यांची पणती साक्षी लंडन येथील ट्रिनिटी युनिव्हर्सिटी येथे शिकलेली असून यूट्यूबवर व्हिडियो बनविने तिला आवडते. अलिकडेच तिने आॅनलाईन म्युझिक व्हिडियोदेखील तयार केला होता. तिच्या आवाजातील निना सिमोनचे ‘फीलिंग गुड’ हे गाणे खूप व्हायरल झाले होते. दोन वर्षांपूर्वी पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवालासोबत पबमध्ये झालेल्या भांडणामुळे सर्वप्रथम ती चर्चेत आली होती.अहान स्वत: इन्स्टाग्रावर पॉप्युलर आहे. त्याच्या क्युट लूक्समुळे तरुण मुलींमध्ये तो चांगलाच लोकप्रिय आहे. तो अधूनमधून त्याचे शर्टलेस फोटो शेअर करीत असतो. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यनच्या चेहऱ्याशी मिळता जुळता तो दिसत असल्यामुळेही तो मध्यंतरी चर्चेत आला होता. चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेचा तो मुलगा आहे. त्याचे वडिल हे मुंबईती एक व्यवसायिक असून त्याची आई फिटनेस ट्रेनर आहे.अहानचे काही निवडक फोटो: