Join us

बाबो..! नोरा फतेहीला कोरिओग्राफर टेरेन्सनं केलं इम्प्रेस, मोरक्कन भाषेत केलं प्रपोज

By तेजल गावडे | Updated: October 5, 2020 20:48 IST

अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आता तिचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत टेरेंस लुईस नोराला तिच्या भाषेत प्रपोज करताना दिसतो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन नोरा फतेही डान्स रिएलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये परीक्षक म्हणून दिसते आहे. शोची खरी परीक्षक मलायका अरोराला कोरोना झाल्यानंतर या शोमध्ये नोराची एन्ट्री झाली होती. शोमधील स्पर्धक नोराचे फॅन होते त्यात आता परीक्षक आणि डान्स कोरिओग्राफर टेरेन्स लुईसदेखील दीवाना झाला आहे. दोघांना शोमध्ये एकमेकांच्या नावानं चिडवलेदेखील जाते. तसेच या सेटवर सर्वांना नोराचा डान्सही खूप आवडतो. 

सेटवरील नोरा फतेहीचा डान्स बऱ्याचदा व्हायरल होतो. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत टेरेन्स लुईस नोरा फतेहीला तिच्या भाषेत प्रपोज करताना दिसतो आहे. व्हिडिओत टेरेन्स नोरा फतेहीच्या आईसाठी मोरक्कन भाषेत मेसेज देते आहे. तो म्हणतोय की आंटी तुमची मुलगी खूप सुंदर आहे. माशाअल्लाह आणि तिचे डोळे खूप सुंदर आहेत.

व्हिडिओत नोरा फतेही टेरेन्सचे बोलणे ऐकून खूश होते. मग भारती तिला पंजाबी भाषेत उत्तर द्यायला शिकवते. त्यानंतर नोरा आणि टेरेन्स डान्स करत आहेत. व्हिडिओत ते दोघे दिलबरच्या अरेबिक व्हर्जनवर डान्स करत आहेत. त्यांच्या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.

नोरा फतेहीचा शो सोडायची वेळ आली आहे. मागील आठवड्यातील भागात सांगितले की नोरा फतेही आता इंडियाज बेस्ट डान्सरमधून अलविदा घेणार आहे. नोराला डेडिकेट करत स्पर्धकांनी दमदार परफॉर्मन्स दिला. जे पाहून नोराला अश्रू अनावर झाले. आता या आठवड्यात मलायका अरोरा शोमध्ये कमबॅक करणार आहे.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसणार आहे. याशिवाय नोराने आतापर्यंत दिलबर, कमरिया, गर्मी, साकी साकी आणि एक तो कम जिंदगानी या गाण्यावर थिरकून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

टॅग्स :नोरा फतेही