चिमुकल्या अबरामचे एसआरकेला क्यूट गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 19:04 IST
. आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा होत आहे. अबरामनेही ‘फादर्स डे’ साजरा केला. केवळ साजराच नाही तर आपल्या पप्पासाठी त्याने क्यूट ग्रिटींगही तयार केले. या ग्रिटींगचा फोटो गौरी खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चिमुकल्या अबरामचे एसआरकेला क्यूट गिफ्ट
किंगखान शाहरूखला दुसरे कुणी नाही तर केवळ त्याचा मुलगा अबराम हाच मात देऊ शकतो, असे अनेकजण म्हणतात. कोण सांगो, हे भाकित खरेही ठरेल. पण त्याबद्दल आपण पुन्हा कधी तरी बोलू. तूर्तास आपण बोलणार आहोत ते ‘फादर्स डे’बद्दल. आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा होत आहे. अबरामनेही ‘फादर्स डे’ साजरा केला. केवळ साजराच नाही तर आपल्या पप्पासाठी त्याने क्यूट ग्रिटींगही तयार केले. या ग्रिटींगचा फोटो गौरी खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ग्रिटींगमध्ये ‘आय लव्ह पापा’ असा क्यूट संदेश अबरामने लिहिला आहे. एक मोठे रेड रंगाचे हार्ट आणि त्याद्वारे दिलेला संदेश म्हणजे अबरामने एसआरकेला आजच्या दिवशी दिलेले मोठ्ठे गिफ्टच म्हणायला हवे..होय ना??