Join us  

  ‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणने केले फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 1:29 PM

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या सिनेमात बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देदीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या सिनेमात बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दीपिका ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.

‘अनफिल्टर्ड इन आर ऑगस्ट २०१९ इश्यू’ असे कॅप्शन देत दीपिकाच्या ग्लॅमरस  फोटोशूटचे फोटो वोग इंडियाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले गेले आहेत. या सगळ्या फोटोमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसते आहे.

 या फोटोशूटमधील दीपिकाचे एक्सप्रेशन्स, तिचा किलर लूक  सगळेच खास आहे. 

 वोग इंडियाच्या या अंकात केवळ दीपिकाचे ग्लॅमरस फोटोशूट नाही तर दीपिकाने दिलेल्या अनफिल्टर्ड प्रश्नांची उत्तरे सुद्धा आहेत. वोगचा ऑगस्टचा कव्हर फोटो खुद्ध दीपिकानेही   तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  बेअरफेस अ‍ॅण्ड अनफिल्टर्ड, असे कॅप्शन तिने दिलेय.

प्रसिद्ध डिझायनर अनाईता श्रॉफ अडजानिया हिने दीपिकाच्या या फोटोशूटमधले कपडे आणि लूक डिझाईन केला आहे. तर ग्रेग स्वेल्स या फोटोग्राफरने ते फोटोशूट शूट केले आहे. या सगळ्या फोटोशूटमध्ये मेकअप वापरला नसल्याने मेकअप आर्टिस्टच्या नावाचा उल्लेख नाही पण स्किनसाठी शूटमध्ये लिझ फ्युगने विशेष काळजी घेतली आहे.

एकंदर काय तर वोग इंडियासाठीचे दीपिकाचे हे ग्लॅमरस फोटोशूट, तिचा नो मेकअप लूक आणि डॅशिंग स्टाईलमध्ये तिने दिलेली उत्तरे याचीच सध्या चर्चा आहे.

दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण