Join us

'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४८ व्या वर्षी आहे सिंगल, लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:43 IST

'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? काय आहे यामागचं कारण? कोण आहे ती, जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी योग्य वयात लग्न करतात, मुलांना जन्म देतात आणि सुखाचा संसार करतात. करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी हे कलाकार व्यवस्थित मॅनेज करतात. पण या इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, जे कोणतीही जबाबदारी न घेता सिंगल राहणं पसंत करतात. बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री जिने अलीकडेच 'छावा' सिनेमात काम केलं. याशिवाय शाहरुख, अजय देवगणसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलंय. वयाच्या ४८ व्या वर्षी ही अभिनेत्री सिंगल आहे. ही अभिनेत्री कोण? जाणून घ्याही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दिव्या दत्ता. अभिनेत्री दिव्या दत्ता आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही ती अजून अविवाहित आहे. तिने IANS ला दिलेल्या मुलाखतीत लग्न न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. दिव्या दत्ताने सांगितलेलं की, ''एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा सिंगल राहणं अधिक चांगलं आहे. एकटं राहा आणि एक सुंदर आयुष्य जगा. मला नेहमीच पुरुषांकडून लग्नाचे संकेत मिळाले, पण माझ्या डोक्यात लग्नाचे कोणतेही विचार नव्हते.''

''यश चोप्रा आणि करण जोहर यांच्या चित्रपटांमध्ये लोक लग्नानंतर आनंदी जीवन जगतात, पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला अशा जोडीदाराची गरज असते जो तुमच्या कामाला महत्त्व देईल आणि समजून घेईल'',  असं मोठं विधान दिव्या दत्ताने केलं आहे. यावर्षी रिलीज झालेल्या 'छावा' सिनेमात दिव्याने सोयराबाईंची भूमिका साकारली होती. दिव्याने तिच्या कारकीर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. तिने शाहरुखसोबत 'बादशाह', 'वीर झारा', 'शक्ती' या सिनेमांमध्ये काम केलंय. दिव्याने फरहान अख्तरसोबत 'भाग मिल्खा भाग'मध्ये साकारलेली मिल्खा सिंग यांच्या बहिणीची भूमिका चांगलीच गाजली होती.

टॅग्स :'छावा' चित्रपटदिव्या कुमारकरण जोहरशाहरुख खानफरहान अख्तर