‘ताकदुम’ मध्ये परी-सुशांतची केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:42 IST
होमी अदजानिया यांच्या ‘ताकदुम’ चित्रपटात परिणीती चोप्रा आणि सुशांतसिंग राजपूत एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट त्यांचा दुसरा चित्रपट असणार ...
‘ताकदुम’ मध्ये परी-सुशांतची केमिस्ट्री!
होमी अदजानिया यांच्या ‘ताकदुम’ चित्रपटात परिणीती चोप्रा आणि सुशांतसिंग राजपूत एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट त्यांचा दुसरा चित्रपट असणार आहे. या अगोदर त्यांनी ‘शुद्ध देसी रोमान्स’ मध्ये एकत्र काम केले आहे.चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त करतांना परिणीती म्हणाली,‘ मला सुशांत सिंग सोबत काम करायला आवडतं. आम्ही जेव्हा ‘शुद्ध देसी रोमान्स’ करत होतो तेव्हा अनेक गिव्ह अॅण्ड टेक्स घेतले होते. पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करणे मला आवडेल.‘ताकदुम’ हा एक रोमँटिक चित्रपट आहे. यात त्या दोन मुख्य कलाकारांमध्ये केमिस्ट्री आणि कम्फर्ट लेव्हल असावी जी माझ्यात आणि सुशांतमध्ये आहे. होमी हा असा दिग्दर्शक आहे जो नेहमीच माझ्या ‘विशलिस्ट’ मध्ये असतो. तसेच मला दिनेश विजन सोबतही काम करायला आवडेल.’