Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहुत हंसते हो, टूटे हो क्या...! घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सुश्मिता सेनच्या वहिनीची ‘ती’ पोस्ट ; संसार धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:02 IST

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे...

ठळक मुद्देचारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2009 मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने गेल्यावर्षी 7 जूनला अभिनेत्री चारू असोपासोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर 16 जूनला दोघांचाही पारंपरिक लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच राजीव व चारूच्या संसारात कुरबुरी सुरू झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशात चारूने तिच्या सोशल अकाऊंटवर काही पोस्ट शेअर केली आणि या चर्चांना आणखी जोर चढला. 

 चारू व राजीव गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत असल्याचे कळतेय. चारूने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘सेन’ हे सरनेमही हटवले आहेत. अशात चारूची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. ‘बहुत हंसते हो, टूटे हो क्या,’ असे चारूने लिहिले. तिच्या या पोस्टने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत.

  खरे तर लग्नाला महिनाही पूर्ण झाला नाही तेवढ्यात राजीव आणि चारू दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा सुरु झाली होती. या काळात चारू आणि राजीवने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. इतके नाही तर दोघांनी आपापले प्रोफाईल फोटोही बदलले होते. अर्थात यानंतर दोघांनीही आमच्यात सगळे काही ऑल वेल असल्याचे सांगत या चर्चा अफवा असल्याचे म्हटले होते. पण आता राजीवनेही चारूसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. अशात दोघांत काय सुरु आहे, हे त्यांनाच ठाऊक.

चारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2009 मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. . 

2016मध्ये चारूने नीरज मालवीयसोबत साखरपुडा केला होता.  ‘मेरे अंगने में’ या मालिकेत चारू व नीरज यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. या सेटवर दोघांत प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच हे नाते तुटले. नीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेन