Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! एका अभिनेत्रीनेच दुसऱ्या अभिनेत्रीला सोशल मीडियाद्वारे केले लग्नासाठी प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:39 IST

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला असून सगळीकडेच या फोटोची चर्चा आहे.

ठळक मुद्देचार्मीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत ती त्रिशाला किस करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. तिने या पोस्टद्वारे तिला प्रपोज केले आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, बेबी, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम असणार आहे.

आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहाण्यासाठी सेलिब्रेटी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते आपल्या खाजगी जीवनाचे, चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या फॅन्सना आपल्याविषयी माहिती देत असतात. अनेकवेळा या सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल केल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. काही वेळा तर ते सोशल मीडियाद्वारे आपल्या आयुष्याविषयी अनेक धक्कादायक गोष्टी त्यांच्या फॅन्सना सांगतात. 

चार्मी कौर ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. दाक्षिणात्य सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री अशीच चार्मीची ओळख आहे. या चार्मीने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला असून सगळीकडेच या फोटोची चर्चा आहे. या फोटोत तिच्यासोबत आपल्याला दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा क्रिश्नन दिसत आहे. चार्मीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत ती त्रिशाला किस करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. तिने या पोस्टद्वारे तिला प्रपोज केले आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, बेबी, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम असणार आहे. मी गुडघ्यावर बसून तुला प्रपोज करत असून तू माझं प्रपोज स्वीकारण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे. आता सगळ्या गोष्टी लीगल झाल्या आहेत... आपण दोघे लग्न करूया... 

चार्मीने त्रिशाच्या वाढदिवसाला ही पोस्ट सोशल मीडियावर टाकून तिला प्रपोज केले आहे. त्यावर त्रिशाने मी तुझे प्रपोज आधीच स्वीकारले असल्याचे म्हटले आहे. त्रिशा आणि चार्मी यांनी प्रभासच्या पोर्णामी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले होते. 

 

त्रिशा आणि चार्मी या दोघींचे अनेकवेळा दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आले आहे. पण त्या दोघींनी यावर दुर्लक्ष करत आपल्या कामाकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. त्रिशाचा जानेवारी 2015 मध्ये चेन्नईतील वरुण मनियन याच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण मे 2015 मध्ये त्या दोघांनी साखरपुडा मोडण्याचे ठरवले. 

चार्मीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्या अनेक फॅन्सचे मन दुखावले आहे. तुम्ही दोघी इतक्या सुंदर आहेत... तुम्ही एकमेकींशी लग्न का करत आहात... मला काय बोलायचे हे तुम्हाला कळले आहे असा त्यांच्या एका फॅनने त्यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.