Join us

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचा ‘Le Bal’मध्ये डेब्यू ! पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:35 IST

‘Le Bal des Débutantes’ या इव्हेंटमध्ये जगभराच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधील २० मुली व २० मुले भाग घेतात. गत शनिवारी हा इव्हेंट पार पडला आणि यंदा अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने ‘Le Bal’ ’मध्ये डेब्यू केला.

कुठलीही डिज्नी प्रिन्सेस मुव्ही किंवा हॉलिवूडचा हायसोसायटी ड्रामा बघा, त्यात एक सीन असतोच असतो. तो कुठला? तर सुंदर सुंदर आणि घेरदार गाऊनमधील सुंदर तरूणी आणि सुटाबूटातील तितकेच हॅडसम तरूण हातात हात घालून येतात आणि मग रंगते ती ग्रॅण्ड पार्टी...ही पार्टी केवळ परिकथेतच असते असे नाही. दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये असाच एक इव्हेंट रंगतो. याचे नाव, ‘Le Bal des Débutantes’ या इव्हेंटमध्ये जगभराच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधील २० मुली व २० मुले भाग घेतात. या इव्हेंटला ‘Le Bal’ ’ नावानेही ओळखले जाते. या फॅशन इव्हेंटद्वारे १६ ते २२ वयोगटातील मुली फॅशन व मीडियाच्या ग्लॅमरस जगात डेब्यू करतात. १९९२ मध्ये ओफेली रेनॉर्डने या ‘Le Bal’चा संपूर्ण फॉर्मेट तयार केला होता.   गत शनिवारी हा इव्हेंट पार पडला आणि यंदा अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने ‘Le Bal’ ’मध्ये डेब्यू केला.अनन्यासोबत तिचा कझिन अहान पांडे यानेही या इव्हेंटमध्ये भाग घेतला. अनन्याने रिहर्सलमध्ये अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला ब्लॅक व गोल्डन ड्रेस परिधान केला होता.गतवर्षी महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही सुद्धा या इव्हेंटमध्ये सहभागी होणार होती. मात्र याचदरम्यान पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नव्याच्या पालकांनी तिचे नाव मागे घेतले होते.‘Le Bal’मध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय मुलींनी भाग घेतला आहे. जम्मू काश्मीरची राजकुमारी अधिश्री सिंह २००९मध्ये या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यानंतर २०११ मध्ये कपूरतलाची शायरा देवीने  छी इं’मधून डेब्यू केला होता. याचवर्षी ईशा अंबानी ही सुद्धा या जगप्रसिद्ध इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. मयूरभंज व जैसलमेरची राजकुमारी अक्षिता, जयती मोदी यांनी गतवर्षी या इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला होता.‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या करण जोहरच्या चित्रपटातून अनन्या बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मध्ये दोन हिरो व एक हिरोईन दिसली होती. तर ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये एक हिरो व दोन हिरोईन असणार आहेत. यापैकी एक हिरोईन अनन्या असणार, अशी चर्चा आहे. अर्थात अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.