मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 14:00 IST
मुंबई.. मायानगरी… स्वप्नांची दुनिया… बॉलिवूडच्या झगमगत्या ता-यांची नगरी.मुंबईत कायमच सिनेमा, मालिकांचं शूटिंग होत असतं.या शूटिंगच्या निमित्ताने लाडक्या बॉलिवूड कलाकारांना ...
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसभर बिनधास्त फिरत होती ‘चुलबुली गर्ल’,पण कोणीही तिला ओळखले नाही!
मुंबई.. मायानगरी… स्वप्नांची दुनिया… बॉलिवूडच्या झगमगत्या ता-यांची नगरी.मुंबईत कायमच सिनेमा, मालिकांचं शूटिंग होत असतं.या शूटिंगच्या निमित्ताने लाडक्या बॉलिवूड कलाकारांना जवळून पाहण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी फॅन्सना मिळत असते.त्यामुळेच की काय शूटिंग पाहण्याची आणि तारे तारकांना भेटण्याची संधी फॅन्स शोधत असतात. सध्या मुंबईतील गर्दी पाहता बरेच निर्माते दिग्दर्शक सिनेमांचे शूटिंग मुंबईशी मिळत्या जुळत्या सेटवर किंवा मग परदेशात करतात.मात्र विकेंडला ज्या मुंबईकरांना सुट्टी होती त्यांनी त्यांच्या लाडक्या बॉलिवूड स्टार्सना जवळून पाहण्याची संधी गमावली असं म्हणावं लागेल.कारण मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्टेशनवर बॉलिवूडचे आजचे तारे अवतरले होते.निमित्त होतं झोया अख्तरच्या आगामी गल्ली बॉयज या सिनेमाच्या शूटिंगचे. आजच्या पीढीचे कलाकार आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह या सिनेमाच्या शूटिंगसाठी चक्क मुंबईतील गोरेगाव स्टेशनवर अवतरले होते. लाल रंगाचा टी-शर्ट, जीन्स, उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, हातात मोबाईल आणि बॅग अशा अवतारात आलिया एकदम मुंबईकर कॉलेज तरुणी वाटत होती. नेहमी लोकल पकडण्यासाठी धावणा-या मुंबईकरांनीही गर्दीत आलियाला ओळखलं नाही. सर्वसामान्य मुंबईकर तरुणीप्रमाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्म क्र.३ वर आलिया लोकलची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळाले.दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंह चॉकलेटी टी शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्स या अंदाजात गोरेगावच्या पूलावर दिसून आला.आलिया आणि रणवीर यांचा हा अंदाज इतका साधा होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही. मात्र सध्या याच शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द आलियानेही गल्ली बॉयज या सिनेमाचं शूटिंगचा अखेरचा दिवस असं पोस्ट करत फोटो शेअर केले आहेत.गल्ली बॉयज हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर रसिकांच्या भेटीला येणार आहे.मात्र आलिया आणि रणवीर यांना गल्ली बॉयज सनेमात रुपेरी पडद्यावर पाहण्याआधी प्रत्यक्ष पाहण्याची संधी काही मुंबईकरांनी अनुभवली तर काहींनी ही संधी गमावली. Also Read:‘राजी’साठी आलिया भट्टने घेतले बरेच कष्ट ! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ!!