Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावती’ वादावर तोडगा काढण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने लढविली शक्कल, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 21:34 IST

‘पद्मावती’ वादावर तोडगा काढण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने एक अनोखी शक्कल लढविली असून, जयपूरमधील दोन प्रख्यात इतिहासकारांना त्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच त्यांनीच यावर भूमिका मांडावी अशी त्यांना विनंती केली आहे.

वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटावर तोडगा काढण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने जयपूरमधील दोन अनुभवी इतिहासकारांना आमंत्रित केले असून, त्यांनी यावर त्यांची भूमिका मांडावी, अशी त्यांना मागणी केली आहे. या इतिहासकारांमध्ये प्रो. बी. एल. गुप्ता आणि प्रो. आर. एस. खांगराट यांचा समावेश आहे. गुप्ता राजस्थान विश्वविद्यालयात इतिहासाचे प्रोफेसर आहेत. तसेच त्यांनी मध्ययुगीन कालखंडांवर बºयाचशा पुस्तकांचे लेखन केले आहे, तर खांगराट  अग्रवाल महाविद्यालयाचे प्रमुख आहेत. दरम्यान, खांगराट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘पद्मावती’ या चित्रपटाचा वाद केवळ करणी सेना किंवा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पुरता मर्यादित नाही, तर हा वाद भन्साळी आणि इतिहासकारांमध्ये आहे. त्यामुळेच आम्ही हा चित्रपट एकदा बघू इच्छितो. ज्यातून हे स्पष्ट होईल की, भन्साळी यांनी मूळ इतिहासात तर छेडछाड केली तर नाही ना? तर गुप्ता यांनी म्हटले की, ‘भलेही कला सादर करण्याचे आपल्या देशात स्वातंत्र असले तरी, त्यासाठी इतिहासाची बोली लावली जाऊ नये. त्यांनी म्हटले की, ‘हे स्पष्ट व्हायला हवे की, आम्ही इतिहासातील तथ्यांवर आधारित सर्वश्रेष्ठ ज्ञानच लोकांपर्यंत पोहोचविणार, त्यासाठी कुठल्याही राजकीय षडयंत्राचे समर्थन करणार नाही. चित्रपटात जोहर (सामूहिक कुर्बानी) या जुन्या परंपरेला प्रभावीरीत्या दाखविले जाणे अपेक्षित आहे, जेणेकरून प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होणार नाही. चित्रपटात रोमान्सला थारा दिला जाऊ नये. सूत्रानुसार पुढच्या महिन्यात चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी चार सदस्यीय पॅनलची नियुक्त करण्यात आली आहे.