Join us

​सेन्सॉर बोर्डाचा पुन्हा ‘दे धक्का’! ‘जग्गा जासूस’ला U/A सर्टिफिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 11:10 IST

एकावर एक धक्के देणाºया सेन्सॉर बोर्डाने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. होय, अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या ...

एकावर एक धक्के देणाºया सेन्सॉर बोर्डाने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. होय, अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A  सर्टिफिकेट दिले आहे.  आता तुम्ही म्हणाल, यात धक्कादायक काय? तर धक्कादायक आहेच. कारण हा चित्रपट बालचित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना याला U/A  प्रमाणपत्र मिळणे, हे धक्कादायक मानले जात आहे.  म्हणजेच,आता हा चित्रपट मुलं केवळ मोठ्यांसोबतच पाहू शकतील.  सेन्सॉर बोर्डाने यात कुठलाही कट सुचवलेला नाही. गुरुवारी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे गेला होता आणि शुक्रवारी म्हणजे अगदी दुसºयाच दिवशी हा चित्रपट मुलांनी एकट्यांनी पाहण्यासारखा नाही, असे सांगत बोर्डाने यास U/A  सर्टिफिकेट देऊन पास केले. बोर्डाच्या या निर्णयावर ‘जग्गा जासूस’च्या अख्ख्या टीमने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात U/A  सर्टिफिकेट देण्यासारखे असे यात काय आहे, हेच टीमला कळत नाहीय.सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या मते, बोर्ड या मुद्यावर काहीही बोलणार नाही. लोक हा चित्रपट बघतील, तेव्हा त्यांचा आपोआप सेन्सॉर बोर्डाचा निर्णय कसा योग्य हे कळेल. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या सायन्स फिक्शन चित्रपटात एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. हा मुलगा आपल्या वडिलांच्या शोधात बाहेर पडतो. यात रणबीर कपूर दहावीतील मुलाची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेसाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली. दहावीतला मुलगा दिसावा म्हणून त्याने यासाठी बरेच वजनही कमी केले. शिवाय यात त्याची हेअरस्टाईलही बदलण्यात आली.