Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या फार्महाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी, बॉलिवूड सेलिब्रेटींचाही असायचा सहभाग, सॅम्युअल आणि दिपेशचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 13:24 IST

या चौकशीत बर्‍याच महत्त्वाचे दावे केले आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ड्रग्स अँगल उघडकीस आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि स्टाफ दीप सावंतची चौकशी केली आहे. या चौकशीत या लोकांनी बर्‍याच महत्त्वाचे दावे केले आहेत.सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतने दावा केला आहे की सुशांत सिंग राजपूत यांच्या फार्म हाऊसवर ड्रग्स वापरली जात होती. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रिया आणि सुशांतच्या घरी गांजा आणायची?

नवभारत टाईम्सच्या, एनसीबीच्या चौकशीत सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनी हा जबाब दिला आहे की, सुशांतच्या घरी ड्रग्स घेऊन येण्यात रियाचा सहभाग होता. सॅम्युअलने हे देखील कबूल केले आहे की सप्टेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत त्याने सुशांतसाठी गांंजा आणला होता. हा गांजा शौविक चक्रवर्तीचा मित्र कमलजीतकडून 2500 रुपयांना घेतला होता. सॅम्युअलने सांगितले की, कमलजीतने हे गांजाचे पॅकेट रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या घरी दिले होते. 

रियाने मान्य केलं ती ड्रग्स खरेदी करायची 

रविवारी एनसीबीने केलेल्या चौकशीत या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली. ड्रग्स विक्रेता बासिद परिहारला पाच वेळा भेटले. सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याची भेट झाली. सुशांत नैराश्येत होता. शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता असं रियाने सांगितले. त्याचसोबत रियाने या चौकशीत एका मोठ्या व्यक्तीचं नाव घेतले पण एनसीबीने या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती