‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
मुंबईत अलीकडेच ‘ट्रॅप्ड’ या आगामी चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली.
‘ट्रॅप्ड’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींची हजेरी
मुंबईत अलीकडेच ‘ट्रॅप्ड’ या आगामी चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली. अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने अत्यंत साध्या वेशात या स्क्रिनिंगला हजेरी लावली. तेव्हा तिने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. अभिनेता राजकुमार राव ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यानेही या स्क्रिनिंगला उपस्थिती नोंदवली. निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याने अत्यंत कॅज्युअल अंदाजात या स्क्रिनिंगला हजेरी लावली. अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांनी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आल्यावर अत्यंत रिलॅक्स मुडमध्ये दिसले. नाम शबाना चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तापसी पन्नू ही देखील कॅज्युअल अंदाजात उपस्थित होती. अभिनेत्री क्रिती सॅनन सध्या जाम चर्चेत आहे. या स्क्रिनिंगलाही ती अत्यंत क्यूट अवतारात आलेली दिसली.