Celebration Time : अमेरिकेहून परताच प्रियंका चोपडाने दिली ग्रॅण्ड पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 21:18 IST
नुकतीच अमेरिकेहून परतलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने गेल्या सोमवारी आपल्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत ...
Celebration Time : अमेरिकेहून परताच प्रियंका चोपडाने दिली ग्रॅण्ड पार्टी!
नुकतीच अमेरिकेहून परतलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने गेल्या सोमवारी आपल्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती. दहा दिवसांसाठी भारतात आलेल्या प्रियंकाकडे पार्टी देण्याचे अनेक कारणे होती. जगातील दुसºया क्रमांकाची सुंदर महिलेच्या बहुमानाबरोबरच तिच्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याचा आनंदाच्या निमित्ताने तिने या पार्टीचे खास आयोजन केले होते. पार्टीत निर्माता करण जोहर, अर्जुन कपूर, सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकाच कारमध्ये आल्याने दोघेही चर्चेचा विषय बनले. यावेळी आलियाने ब्लू डेनिम आणि चे शर्ट कॅरी केले होते. तर सिद्धार्थ ब्लू टी-शर्ट आणि जीन्समध्ये बघावयास मिळाला. यांच्याव्यतिरिक्त पार्टीत सलमानची बहिण अर्पिता, गोल्डी बहल, अर्जुन कपूर अन् त्याची बहीण अंशुला कपूर, मसाबा गुप्ता, मधु मंतेना, नित्या मेहरा, सिद्धार्थ रॉय कपूर, आदित्य रॉय कपूर, प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा, मिनी माथुर, पुनीत मल्होत्रा, रितेश सिधवानी आदींनी हजेरी लावली होती. दहा दिवसांसाठी भारतात आलेली प्रियंका तिच्या पहिल्या वहिल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाचे प्रमोशन करणार आहे. त्याचबरोबर काही बॉलिवूड प्रोजेक्टवरही ती काम करणार आहे. त्यानंतर ती पुन्हा अमेरिकेत परतणार असून, तिथे ड्वेन जॉनसन आणि जॅक अफ्रॉन यांच्याबरोबर प्रमोशन इवेंट्समध्ये भाग घेणार आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रियंका व्हिक्टोरियाची निगेटिव्ह भूमिका साकारत आहे.