Join us
Daily Top 2Weekly Top 5

31 वा बर्थ डे सेलिब्रेट करते शक्ती कपूरची लाडकी लेक,पाहा लहानपणी असा होता तिचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 13:41 IST

बॉलिवूडची हसिना,बॉलिवूडची आशिकी गर्ल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 3 मार्च 1987 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.आज ...

बॉलिवूडची हसिना,बॉलिवूडची आशिकी गर्ल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 3 मार्च 1987 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.आज ती 31 व्या वर्षात पदार्पण करत आहे.श्रद्धासाठी तिचे मित्र आणि कुटुबियांनी खास सरप्राईजचे प्लॅनिंग केले आहे.श्रद्धा कपूर म्हणजेच शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची ही लेक.शक्ती कपूर यांच्यासह चिमुकल्या श्रद्धाचा लूक तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल. वडिल शक्ती कपूर पंजाबी आणि आई शिवांगी मराठी असल्यामुळे श्रद्धावर बालपणापासून दोन्ही संस्कार झाले आहेत.चिमुकल्या श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे. लहानपणी ती कायमच आपल्या वडिलांसोबत म्हणजेच शक्ती कपूर यांच्याबरोबर सेटवर जात असे. त्यांना पाहून त्यांचे डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत असे. शिवाय आरशासमोर उभी राहून ती डान्स करत असे. त्यामुळेच की काय आज एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून श्रद्धा कपूर हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.आशिकी 2, एक व्हिलन, एबीसीडी 2, बागी, रॉक ऑन 2 अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पीढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच तिचे अनेक बालपणीच्या  फोटो पाहून तुम्हालाही आजची आघाडी नायिका असलेली श्रद्धा कपूरचे अनेक लहानपणीचे फोटो पाहून तिचा  चुलबुला अंदाज लक्षात येईल.  शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहे. दोघे ही श्री नारायण सिंग यांचा चित्रपट बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिदने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे.आता त्याला श्रद्धा कपूरने सुद्धा ज्वाईन केले आहे. या गोष्टीची माहिती श्रद्धाने ट्विटरवरुन दिली आहे.श्रद्धा यात एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे.